आज स्वरानंदात सतारवादन
खुलामंच अंतर्गत रवींद्र भवन मडगाव येथे येत्या शुक्रवारी 14 जून 2024 रोजी संध्याकाळी ठीक 6.30 वाजता श्री लक्ष्मीकांत खांडेकर यांच्या सतार वादनाचे आयोजन केले आहे.
गोमंतकीय सतार वादक पं.योगराज नाईक यांचे लक्ष्मीकांत खांडेकर हे शिष्य असून त्यांनी काहीकाळ उ. शाहीद परवेज खान व शाकीर खान यांच्याकडूनही सतार वादनाचे धडे घेतलेले आहेत. सुरुवातीला कला अकादमी येथे उ. छोटे रहमत खान यांच्याकडेही त्यांनी सतार वादनाचे शिक्षण घेतलेले आहे.
श्री लक्ष्मीकांत खांडेकर हे स्वतंत्र सतार वादनाबरोबर जुगलबंदी आणि फ्युजन वादनातही तरबेज आहेत. सुरेश केसरबाई केरकर, सम्राट संगीत समारोह, श्रीधर पार्सेकर संगीत समारोह, स्वरसाधना नेहरू सेंटर (मुंबई) महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे युनिव्हर्सिटी, आर्यादुर्गा सांस्कृतिक मंडळ, कणकवली कर्नाटका म्युझिकल सर्कल, नक्षत्रोत्सव, स्वरांगण,मा. शिवराम मोपकर स्मृती संगीत समारोह ई. प्रतिष्टीतठिकाणी तसेच कर्नाटक महाराष्ट्र या राज्यात विविध कार्यक्रमात त्यांनी आपले सतारवादन केलेले आहे.
कला आणि संस्कृती खात्यात ते सतार प्रशिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत.
सतार ह्या गोड वाद्याचे खूप कमी वादक गोव्यात आहेत. संगीत प्रेमींनी मुद्दाम स्वरानंद कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री लक्ष्मीकांत खांडेकर यांच्या सतार वादनाचा आस्वाद घ्यावा व कलाकारांना उत्तेजन द्यावे .