रवींद्र भवन, मडगाव व सम्राट क्लब, मडगाव सेंट्रल आयोजित “रंगभूमी दिन” ९ नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत हे प्रमुख अतिथी म्हणून तर ज्येष्ठ नाट्यकर्मी तसेच “संभवामी युगे युगे” महानाट्यातून प्रसिद्धी मिळविणारे कलाकार डॉ. मोहनदास वासुदेव कामत हे सन्माननीय अतिथी या नात्याने उपस्थित होते.
नाट्यसक्षेत्रात आपले भरीव योगदान दिलेल्या मडगावतील काही ज्येष्ठ नाट्यकलाकारांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यात ज्येष्ठ नाट्यकर्मी व गायक कलाकार दामोदर पुंडलिक काणेकर, देवबाला शशिकांत भिसे, प्रमिला सुभाष बोरकर तसेच ज्येष्ठ रंगकर्मी उमाकांत सावंत यांचा समावेश होता. त्यानंतर “नाट्यरंग” हा सावेश साभिनय लोकप्रिय नाट्यसंगीताचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. यात गोव्यातील सुप्रसिद्ध गायक कलाकार गायत्री पाटील, शारदा शेटकर, नितीन देसाई, युगा सांबारी तसेच गौरांग भांडिये सहभागी होते. त्यांना शिवानंद दाभोलकर (ऑर्गन) व नितीन कोरगावकर (तबला) हे साथसंगती म्हणून होते. हा कार्यक्रम अगदी सुरेख पार पडला.