
बोलावा विठ्ठल ॥
11 11 people viewed this event.
रवींद्र भवन मडगाव देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीनिमित्त गेल्या कित्येक वर्षापासून बोलावा विठ्ठल कार्यक्रमाचेआयोजन करत असून यंदाही रविवार दिनांक. 6 जुलै 2025 रोजी भक्ती भावे आयोजित करण्यात येणार आहे.
यंदाचे खास आकर्षण म्हणजे युवावर्गापासून थोरांपर्यंत आपल्या जादुई गायनाने लोकप्रियता मिळवलेला युवा गायक राजयोग धुरी .
जो मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रियालिटी शोचा विजेताही आहे . बोलावा विठ्ठल कार्यक्रमात राजयोग धुरी तसेच गोमंतकीय युवा प्रतिभावंत गायीका,संगीत सम्राट सितारा विजेती अर्चना सतीश कामुलकर ह्यांचेही गायन आयोजित करण्यात आले आहे. सोबत डॉ. गोविंद भगत यांचे पुरक असे निरूपण असून सर्व रसिक प्रेक्षकांनी रवींद्र भवन मडगाव येथे उपस्थित राहून दरवर्षीप्रमाणेच यंदाही उस्फूर्त प्रतिसाद द्यावा.